शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  गांधी छायाचित्र प्रदर्शन प्रेरणादायी : डॉ. देवानंद शिंदे-- ६ आॅक्टोबरपर्यंत खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:10 IST

महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य या छायाचित्र प्रदर्शनामुळे इतिहासापासून वर्तमान उज्ज्वल करण्याची प्रेरणा आजच्या तरुणांना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

ठळक मुद्देया प्रदर्शनात दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काळातील दुर्मीळ अशी २९ छायाचित्रे

कोल्हापूर : महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य या छायाचित्र प्रदर्शनामुळे इतिहासापासून वर्तमान उज्ज्वल करण्याची प्रेरणा आजच्या तरुणांना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी केले.  

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने दसरा चौकातील शाहू स्मारक भवनाच्या प्रदर्शनगृहात महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काळातील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी प्रदर्शनाच्या संकल्पनेचे कौतुक केले. ते म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोहनदास करमचंद गांधी या बॅरिस्टर व्यक्तीचा महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला, याची विलक्षण माहिती दर्शकास मिळते. आपल्याला माहिती असलेल्या गांधीजींपेक्षा एक वेगळे गांधी या प्रदर्शनातून आपल्याला दिसतात. हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

या प्रदर्शनात दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काळातील दुर्मीळ अशी २९ छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन ६ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, त्याचा कोल्हापूरवासियांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी याप्रसंगी केले. 

यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. किशोर बेडकीहाळ, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, अधिसभा सदस्य संजय जाधव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गांधी एक्झिबिशन शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने दसरा चौकातील शाहू स्मारक भवनाच्या प्रदर्शनगृहात महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काळातील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. भारती पाटील.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर